१६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

शिर्डी –

राज्‍य शासनाने दिनांक १६ नोव्‍हेंबर २०२० पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले

करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज ०६ हजार साईभक्‍तांना

दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना तसेच मास्‍क

न वापरणा-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

श्री.बगाटे म्‍हणाले, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक

उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी

मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाने दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून पाडव्‍याच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश

दिलेले आहेत. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन त्‍याअनुषंगाने संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनाकरीता खुले

करण्‍यासाठी साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपाययोजना करण्‍याकरीता श्री साई सभागृह येथे जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नियोजन बैठक

आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीस पोलिस अधिक्षक मनोज पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील, अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक श्री.अग्रवाल, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उप अधिक्षक राहुल मदने, संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे व मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते

. यावेळी जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शनपर सुचना करुन दर्शनरांग व साईप्रसादालय येथील व्‍यवस्‍थेची पाहणी केली.

दिनांक १६ नोव्‍हेंबर रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार आहे. दिवसभरात ०६ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला

जाईल. यापैकी ०३ हजार सशुल्‍क पासेस व ०३ हजार मोफत पासेस असतील. साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे

येतील अशा साईभक्‍तांना ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करावी लागेल. या ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे

काऊंटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहेत. ०३ हजार ऑफलाईन पासेसपैकी ०१ हजार पासेस शिर्डी ग्रामस्‍थांना सकाळी ०५.४५ ते ०६.४५ यावेळेत संस्‍थानचे साईआश्रम ०१, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास काऊंटर वरुन दिले

जातील. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकुण ६० साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल. त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणा-या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरतीपासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथुन दिले जाणार असून ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील तसेच

शुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर ०१ समोरील जनसंपर्क कार्यालय येथील पास वितरण कक्षातुन दिले जातील. सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता

जाताना मास्‍कचा वापर करावा. मास्‍कचा वापर न करण्‍या–या साईभक्‍तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे.

दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश दिला जाणार असून व्‍दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ०५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था

करण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तात्‍काळक उपचाराकामी कोवीड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येईल असे श्री.बगाटे यांनी सांगितले.

तसेच ज्‍या साईभक्‍तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता

यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्री.बगाटे यांनी केले. 

photoSai Publicity Dept.
Public Relation Office, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi,Ph.No:- (02423) 258775, 258500 | Fax:- (02423) 258770. Help Line :- (02423) 258888 | saibaba@sai.org.in, saibaba@shrisaibabasansthan.org,www.sai.org.in,Post: Shirdi, Tal: Rahata, Dist: Ahmednagar, M.S (INDIA), 423109.

Visit our Website to see details about Shri Saibaba at – www.sai.org.in,  For online advance Darshan / Aarti passes &  Accomodation booking facility,  please visit our website : – http://online.sai.org.in.

Like us share us

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *