श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या कर्मचा-यांना राज्‍य शासनाने लागु केलेला सातवा वेतन आयोग ०१ जानेवारी २०१६ रोजी पासुन लागु करण्‍याचा निर्णय

0
247
पसंद करे

शिर्डी –

          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या कर्मचा-यांना राज्‍य शासनाने लागु केलेला सातवा वेतन आयोग ०१ जानेवारी २०१६ रोजी पासुन लागु करण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला असून फरकाची रक्‍कम कर्मचा-यांना रोखीने देण्‍यात येवुन चालु महिन्‍यापासून सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्‍याची कार्यवाही करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

          याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्‍हे, राजा बली सिंग,विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी व उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते.

          याप्रसंगी डॉ.हावरे म्‍हणाले, संस्‍थानच्‍या आस्‍थापनेवर असलेल्‍या कायम कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनाकडे पा‍ठविण्‍यात आला होता. त्‍यावर माननिय मुख्‍यमंत्री महोदय यांची स्‍वाक्षरी झाली आहे. त्‍यावर शासनाकडून आजच पत्र प्राप्‍त झाले असून याबाबत संस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीने निर्णय घ्‍यावा असे कळविलेले आहे. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या  कायम कर्मचा-यांना दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासुन सातवा वेतन आयोग लागु करण्‍याचा निर्णय आज घेण्‍यात आलेला असून फरकाची रक्‍कम रोखीने देण्‍यात येणार असून चालु महिन्‍याच्‍या वेतनापासून यांची कार्यवाही सुरु करण्‍यात येईल. या निर्णयामुळे फरकाच्‍या रक्‍कमेपोटी ३७ कोटी तर पुढील वर्षासाठी २० कोटी असा ५७ कोटी रुपयाचा अर्थिक भार संस्‍थानवर पडणार असुन यांचा लाभ १९५० कर्मचा-यांना होणार आहे. याबरोबरच अनुकंपा तत्‍वावर संस्‍थान सेवेत सामावुन घेण्‍याबाबत अनेक वेळा मागणी करत असलेल्‍या ६३ कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत कायम करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आलेला आहे. तसेच नर्सिंग कत्रांटी कर्मचा-यांना ४० टक्‍के पगार वाढ देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आलेला आहे.

          महाराष्‍ट्र शासनाने ३३ कोटी वृक्षरोपन करण्‍याचे लक्ष ठेवुन वनमहोत्‍सव कार्यक्रम राबविला आहे. याचा एक भाग म्‍हणुन संस्‍थानने वृक्षरोपन कार्यक्रमाचा शुभारंभ केला असून आज २०० झाडे लावली आहे. तसेच अजुन ३ हजार वृक्ष याकालावधीत लावण्‍यात येतील. याबरोबरच वृक्षलागवड वाढवावी म्‍हणून काही सामाजिक संस्‍थांनी वृक्षांची मागणी केली तर संस्‍थानच्‍या वतीने विनामुल्‍य रोपे देण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे.

          देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते चार प्रकल्‍पांचे भुमिपूजन झाले होते. त्‍यापैकी १११ कोटी रुपये खर्च करुन उभारण्‍यात येणा-या दर्शनरांगेचे काम प्रगतीपथावर असून येत्‍या एक वर्षात ते पुर्ण होईल. या दर्शनरांगेची मुख्‍य इमारतीचे बांधकाम क्षेत्र २०,०८२ चौ.मी. आहे. या इमारतीमध्‍ये ०३ भव्‍य प्रवेश हॉल असून यामध्‍ये मोबाईल व चप्‍पल लॉकर्स, बायोमेट्रीक पास काऊंटर, सशुल्‍क पास काऊंटर, लाडू विक्री काऊंडर, उदी व कापडकोठी काऊंटर, बुक स्‍टॉल, डोनेशन ऑफिस, चहा कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र असे स्‍वच्‍छता गृहे, उदवाहक, आरओ प्रक्रियेव्‍दारे शुध्‍द पिण्‍याचे पाणी, वायुविजन व्‍यवस्‍था, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने फायर फायटींग यंत्रणा व सिक्‍युरिटी चेक इत्‍यादी व्‍यवस्‍था असणार आहे. या  इमारतीमध्‍ये एकुण १२ हॉल असतील यासर्व हॉल मिळून सुमारे १८००० साईभक्‍तांची व्‍यवस्‍था होईल. दुसरा प्रकल्‍प १५८ कोटी रुपये खर्चाचे शैक्षणिक संकुल उभारणी हे काम ही प्रगतीपथावर आहे. तिसरा प्रकल्‍प १० मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारणीचे टेंडर प्रक्रिया सुरु आहे. तसेच चौथा प्रकल्‍प साईनॉलेज पार्क बीओटी तत्‍वावर उभारण्‍याची टेंडर प्रक्रिया सुरु आहे. ध्‍यान मंदिर उभारणीचे काम ही येत्‍या महिन्‍याभरात पुर्ण होणार आहे.

          शिर्डी शहर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची जबाबदारी संस्‍थानने घेतली असून अशी जबाबदारी उचलणारे देशातील एकमेव देवस्‍थान आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने २० टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्‍प उभारण्‍याची निविदा प्रक्रिया सुरु असल्‍याचे डॉ.हावरे यांनी सांगितले. 

——————————————————————————–

 Shirdi:

             The management committee of the ShriSaibaba Sansthan Trust, Shirdi has decided to implement 7th Pay Commission for its employees with effect from 1st January 2016 and to pay the difference in cash. This has been already implemented by the State Government for its employees. Sansthan Chairman Dr.Suresh Haware said at a Press conference that action to pay the salaries according to the 7th Pay Commission will be effective from current month.

            On this occasion Mr.Deepak Muglikar, Chief Executive Officer of the Sansthan, Trustees S/shri Advocate Mohan Jaykar, Bhausaheb Wakchoure, Bipindada Kolhe, Raja Bali Singh, Trustee and City Council Chairman Smt.Archanatai Kote, Dy.Chief Executive Officer Mr.Ravindra Thakare, Chief Accounts Officer Mr.Babasaheb Ghorpade, Administrative Officers S/Shri Dr.Akash Kisve, Suryabhan Game, Dilip Ugale, Ashok Auti and Dy.Executive Engineer Raghunath Aaher and others were present.

            Speaking on this occasion Dr.Haware said that a proposal for implementation of 7th Pay Commission to permanent employees on the rolls of Sansthan was sent to the State Government. The same has been signed by Hon Chief Minister. The letter about the same has been received today only and we have been informed that a decision is to be taken by the management Committee of the Sansthan. Accordingly a decision has been taken today to implement 7th Pay Commission for permanent employees of the Sansthan with effect from 1stJanuary 2016. The amount of difference will be paid in cash and the salaries as per 7th pay Commission will be activated from current month. The decision will place a financial burden of a total of Rs. 57 Crores with Rs.37 Crores for payment of difference and Rs.20 Crores for the next year. The benefits will be accrued to 1,950 employees of the Sansthan. At the same time a decision has been taken to make 63 employees permanent who have been demanding frequently for absorption in Sansthan services on compassionate grounds. A decision has also been taken to raise the salaries of Contract Nursing staff by 40%.

            Government of Maharashtra has set a target to plant 33 Crore trees and organized a Forest Festival program. As a part of this the Sansthan has inaugurated Tree plantation program and today we have planted 200 trees. 3,000 more trees will also be planted during this period. The Management Committee has also decided to provide saplings FREE of charge on behalf of the Sansthan to Social organizations against their demand.

            Ground breaking Ceremony for 4 projects was held at the hands of Prime Minister Hon Mr. Narendra Modi. Out of these the work on Rs.111 Crore Darshan “Q” is in progress and will be completed within one year. The area of the main building of this Darshan “Q” is 20,082 sq. mtrs. The building has 3 huge halls complete with Mobile and Chappal Lockers, Biometric pass counter, Paid pass counter, Ladu sales counter, Udi and clothes counter, Book stall, Donation Office, Tea and coffee counter, Independent wash rooms for ladies and gents, lifts, Pure drinking water through RO process, Air circulation system, Firefighting system from the point of view of security, and Security check etc.  The building will have a total of 12 Halls and all the halls together will be able to accommodate 18,000 devotees. The second project is for setting up an Educational Complex at an expenditure of Rs.158 Crores. The work is in progress. The third project of 10MW capacity Solar project for which the tender process is in progress. The fourth project is Knowledge Park. The process for tenders to establish the same on BOT basis is in progress. The work of erection of Dhyaan Mandir will also be completed within a month.  

            Dr.Haware further said that the Sansthan has taken the responsibility to keep Shirdi city clean and this is the only Sansthan to take up this responsibility. Sansthan is in the process of inviting tenders for erection of a 20 Ton Capacity Solid Waste Management project.

2 Attachments


पसंद करे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here